लातूर तालुक्यातील 14 गावांमधील कुणबी नोंदणीची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध; कुणबी नोंदीधारक वारसांनी प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याचे आवाहन

 

लातूर तालुक्यातील 14 गावांमधील कुणबी नोंदणीची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध;

कुणबी नोंदीधारक वारसांनी प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याचे आवाहन

लातूर, दि. 8 (जिमाका) : कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी मराठा जातीचे कुणबी जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याबाबत 31 ऑक्टोबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुचना प्राप्त झाल्या आहेत. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने लातूर तालुक्यातील 14 गावांमध्ये उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या अहवालानुसार नमुना 33/34 मध्ये कुणबी जातीच्या नोंदी आढळून आलेल्या आहेत. आढळून आलेल्या नोंदी लातूर जिल्हा संकेतस्थळावर latur.nic.in वर अपलोड करण्यात आलेल्या आहेत. तरी त्यांच्या वारसांनी कुणबी प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याचे आवाहन लातूरच्या उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी केले आहे.

कुणबी नोंदीधारकांच्या वारसास वंशावळ जुळविण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील पक्का बुक संबंधितास उपलब्ध करुन देण्यात येवून नमुना 33/34 मध्ये आढळून आलेल्या कुणबी नोंदी धारकांच्या वारसांना 33/34 ची नक्कल तसेच पक्का बुक व आवश्यक ते सर्व अभिलेखे उपलब्ध करुन देण्यात यावेत. सर्व कुणबी नोंदीधारकांच्या वारसांना आवश्यक ते सहकार्य करण्याबाबत उपअधीक्षक भूमी अभिलेख  यांना कळविण्यात आले आहे. तसेच लातूर उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालय येथे कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात येत आहे. तरी सापडलेल्या कुणबी नोंदीधारक यांच्या वारसांनी वेबसाईटवरुन कुणबी नोंदीचा शोध घेवून जास्तीत जास्त कुणबी नोंदीधारकाच्या वारसांची प्रमाणपत्र घेण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती नऱ्हे-विरोळे यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु