बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राज्याबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी रवाना

                                   बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प

राज्याबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी रवाना

 


लातूर, दि. 03 (जिमाका) :
 बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत प्रशिक्षणासह राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्यातील 45 शेतकरी रवाना झाले. मूल्य साखळी विकास शाळा घटकांतर्गत अंतिम मान्यता प्राप्त समुदाय आधारित संस्थेच्या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. 1 जानेवारी ते 7 जानेवारी 2024 कालावधीत हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.


जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक शिवसांब लाडके, कृषी विद्यावेत्ता अरुण गुट्टे, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी रवींद्र पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप जाधव, पुरवठा साखळी व मूल्य साखळी विकास तज्ज्ञ मोहन गोजमगुंडे, यांनी हिरवी झेंडी दाखवून अभ्यास दौऱ्याला शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्यांसमवेत वित्त प्रवेश सल्लागार तथा अर्थशास्त्रज्ञ श्रीराम हेलाले व प्रापण तज्ज्ञ शिवाजी राऊत यांना दौरा यशस्वी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु