क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते भारतीय प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

 

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते

भारतीय प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

लातूर, दि. 24 (जिमाका): भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार, 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9.15 वाजता लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे.

ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभासाठी 15 मिनिटे अगोदर समारंभाच्या ठिकाणी आसनस्थ होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा मुख्यालयातील सर्व कार्यालये व शैक्षणिक संस्थांनी त्यांचे ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी 8.30 पूर्वी किंवा सकाळी 10 नंतरच आयोजित करावेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु