लातूर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात राज्यात पुन्हा पहिला ; नोव्हेंबर महिन्याची क्रमवारी जाहीर

 

लातूर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात राज्यात पुन्हा पहिला ; नोव्हेंबर महिन्याची क्रमवारी जाहीर

 

लातूर दि.25(जिमाका) राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून गेल्या काही महिन्यापासून राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम  राबविण्यासाठी जिल्ह्याला गुण दिले जात आहेत. नोव्हेंबरचे गुणानुक्रम नुकतेच जाहीर झाले असून त्यात लातूर जिल्ह्याला राज्यात सर्वाधिक 47.73 एवढे गुण मिळाले असून जिल्हा राज्यात पहिला आला आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्या मार्गदर्शनखाली केलेल्या कार्याची ही पावती असून हे सेवा सातत्य ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहिल अशी माहिती जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली.

    राज्यातील आरोग्य विभागाकडून राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन, क्षयरोगदुरीकरण, ज्येष्ठाच्या आरोग्याची काळजी, यासह प्रशासनातील बाबीही या गुणांकनात गृहीत धरल्या जातात. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अंतर्गत सर्व ग्रामीण रुग्णालय, जिल्हा उपरुग्णालय येतात. हे गुणांकन पद्दत सुरु झाल्यापासून लातूर जिल्हा पहिल्या पाच क्रमांकात येतो. पण आमचा प्रयत्न अजून गुणवत्ता सुधारण्याची असेल अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु