माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांच्या निवृत्तीवेतनासाठी फेब्रुवारीमध्ये पेंशन अदालत

 

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांच्या

निवृत्तीवेतनासाठी फेब्रुवारीमध्ये पेंशन अदालत

 

*लातूर, दि. 12 (जिमाका) :*   14 जानेवारी, 2024 रोजी भूतपूर्व सैनिक दिवस निमित्त मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा कार्यालयामार्फत 9 जानेवारी, 2024 रोजी पुणे येथे पूर्व सैनिक मेळावा रद्द करुन पुढे ढकलण्यात आला आहे. हा मेळावा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजित केले आहे. या कार्यक्रमात भूतपूर्व सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, विधवा पत्नी तथा त्यांच्या अवलंबित यांच्या पेंशन, ईसीएचएस, सीएसडी कॅन्टीन याबाबतच्या असणाऱ्य अडीअडचणीचे निराकरण करण्यात येणार आहे.

ज्या सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता , विधवा पत्नी तथा त्यांच्या अवलंबित यांच्यावरील प्रकारच्या अडीअडचणी असतील त्यांनी विहित नमुन्यामध्ये माहिती व तीन प्रतीमध्ये 17 जानेवारी, 2024 पर्यंत लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु