मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी घरोघरी येणाऱ्या सर्वेक्षकांना सहकार्य करावे - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

                                        मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी

घरोघरी येणाऱ्या सर्वेक्षकांना सहकार्य करावे

-         जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

लातूर दि. 5 (जिमाका): महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर तयारी केली आहे. या मोहिमेत एकही कुटूंब वंचीत राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात सर्वेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या या सर्वेक्षकांना आवश्यक माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

शहरी आणि ग्रामीण भागात सर्वेक्षणासाठी अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून गरज पडली तर आणखी मनुष्यबळ वाढविले जाणार आहे. तसेच सर्वेक्षण कालावधीत कोणीही मुख्यालय सोडणार नाही, अशी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. महानगरपातळीवर मनपाचे आयुक्तवार्ड निहाय अधिकारी-कर्मचारी यांच्यावर सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. तालुकापातळीवर महसूल यंत्रणासंबंधित नगरपरिषदा तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतीपंचायत समिती यांच्या समन्वयातून हे सर्वेक्षण युद्धपातळीवर विहित कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.

सर्वेक्षणाला नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असून प्रशासनाने नियुक्त केलेले सर्वेक्षक घरी आल्यानंतर त्यांना आवश्यक माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. तसेच यामध्ये स्वयंसेवी संस्थांनीही प्रशासनला सहकार्य करावे, असे त्यांनी म्हटले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु