पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेसाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल

योजनेसाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लातूर, दि. 16 (जिमाका):  इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या 13 डिसेंबर, 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाने भटक्या जमाती क प्रवर्गातील  धनगर समाज बांधवासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना सुरु केलेली आहे.

या योजनेंतर्गत राज्यातील  धनगर समाजातील वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी 25 हजार उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. लातूर जिल्ह्यातील धनगर समातातील पात्र लाभार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपले अर्ज संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्यामार्फत 31 जानेवारी, 2024 पर्यंत सादर करण्याचे असे अवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक यांनी केले आहे.

******

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु