पशुसंवर्धन विभागाच्या ‘मैत्री’ प्रशिक्षणासाठी 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

पशुसंवर्धन विभागाच्या ‘मैत्री’ प्रशिक्षणासाठी

10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लातूर, दि. 24 (जिमाका): केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार यांना राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत ‘मैत्री’ म्हणून प्रशिक्षण द्यावयाचे आहे. प्रशिक्षीत व्यक्तीची कृत्रिम रेतन व अनुषंगिक कार्य करण्यासाठी नियुक्ती करावयाची आहे. जेणेकरून राज्यातील गायी-म्हशीमध्ये कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढेल व ग्रामिण भागातील सुशिक्षीत बेरोजगार यांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच दुग्ध उत्पादनात वाढ होवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल. या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘मैत्री’ प्रशिक्षण कार्यक्रम तीन महिने कालावधीचा असून यामध्ये एक महिना क्लासरूम ट्रेनिंग व दोन महिने प्रॅक्टीकल ट्रेनिंगचा समावेश राहील. क्लासरूम ट्रेनिंग पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात येईल व प्रॅक्टीकल ट्रेनिंग जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -1 किंवा तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय किंवा जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय या ठिकाणी घेण्यात येईल. प्रशिक्षण घेण्यासाठी ईच्छुक हा किमान बारावी उत्तीर्ण झालेला असावा. त्याचे वय 18 ते ३५ वर्षे असावे. अर्जाचा नमुना पशुधनविकास अधिकारी (वि.) पंचायत समिती यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध होईल. लातूर जिल्हासाठी सर्वसाधारण प्रवर्ग व अनुसूचित जाती प्रवर्ग याप्रमाणे एकूण 200 उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.

या योजनांतर्गत इच्छुक उमेदवारांनी 24 जानेवारी, 2024 ते 10 फेब्रुवारी, 2024 पर्यंत आपल्या तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी (वि.) पंचायत समिती यांचेकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन  जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्रीधर शिंदे यांनी केले आहे.

                                                  *****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु