जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी 20 जानेवारी रोजी परीक्षा

 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी 20 जानेवारी रोजी परीक्षा

·         इयत्ता सहावीतील 80 जागासाठी परीक्षेचे आयोजन

·         परीक्षा प्रवेशपत्र विद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

लातूर, दि. 17 (जिमाका):  येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता सहावीसाठी 80 जागा भरण्यासाठीची लेखी परीक्षा 20 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. ही परीक्षा लातूर जिल्ह्यातील 36 परीक्षा केंद्रांवर होईल. ही प्रवेश परीक्षा लेखी स्वरूपाची असून ज्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केलेले आहेत त्यांचे परीक्षा प्रवेशपत्र www.navodaya.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध झाले असून परीक्षेवेळी या प्रवेश पत्राची प्रिंट घेऊन येणे आवश्यक आहे.

प्रवेश पत्रावर दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेश पत्रावर दिलेल्या परीक्षा केंद्रावर 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यांचे पालक व ते शिकत असलेल्या शाळेतील शिक्षक मुख्याध्यापकांनी याकडे विशेष लक्ष द्यावे. याबाबत अधिक माहितीसाठी प्रवेश परीक्षा प्रभारी बी. डी. शेख (भ्रमणध्वनी क्र. 9817834930) किंवा व्ही. एच. खिल्लारे (भ्रमणध्वनी क्र. 9860568840) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन लातूर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील यांनी केले आहे.

******

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु