शेतीतील नवीन तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यावर जाण्याची संधी

·        2 फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

लातूर, दि. 29 (जिमाका): जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, विकसित होत असलेले तंत्रज्ञान याबाबत माहिती घेण्यासाठी भारताबाहेरील देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी याच्याशी प्रत्यक्ष भेटीची, तसेच संस्थांना भेटी देण्याची संधी मिळणार आहे. यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी परदेशात अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले जाणार असून यासाठी शेतकऱ्यांनी 2 फेब्रुवारी 2024 पर्यानात तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

शेतकऱ्याचे ज्ञान व क्षमता उंचावण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे परदेशात अभ्यास दौरे आयोजित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जर्मनी, फ्रांस, स्पेन, स्वित्झरलँड, ऑस्ट्रीया, न्यूझीलँड, नेदरलँड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलँड, पेरु, ब्राझील, चिली, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर इत्यादी देशाची निवड करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या परदेशातील अभ्यास दौऱ्यासाठी शासनाकडून एकूण खर्चाच्या 50 टक्के किंवा एक लाख रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम देय राहील. तसेच श्ताकार्यांची निवड जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु