डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी 15 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

                                               डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी

15 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

 

लातूर दि. 2 (जिमाका) :   राज्यातील नोंदणीकृत मदारसांना आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2023-2024 मध्ये राबविण्याबाबत कळविण्यात आले आहे. 11 ऑक्टोबर, 2013 आणि 22 डिसेंबर 2023 च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणार आहे. तरी याबाबतचे प्रस्ताव संबंधित संस्था, मदरसा चालकांनी 15 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी यांनी केले आहे.

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण या नियमितपणे राबविल्या जाणाऱ्या योजनेतंर्गत संस्थाचालकांनी, मदरसा चालकांनी 11 ऑक्टोबर, 2013 व दि. 22 डिसेंबर, 2013 च्या शासन निर्णयाप्रमाणे विहीत नमुन्यात रीतसर परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर या कार्यालयास 15 जानेवारी, 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी, असे जिल्हा नियोजन अधिकारी यांनी कळविले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु