लातूर जिल्हात 23 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध

 लातूर  दि. 21 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सुधारित कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतीम प्रसिद्धी 22 जानेवारी, 2024 करण्यात येणार होती. मात्र यादिवशी राज्य शासनाने राम लल्ला प्राण प्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहिर केली आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

 लातूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरावर, तसेच तहसील व उपविभागीय स्तरावर 23 जानेवारी 2024 अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तरी मतदारांनी यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु