उदगीर येथे 27 जानेवारीपासून दोन दिवसीय पशु व कुक्कुट पक्षी प्रदर्शन

 

उदगीर येथे 27 जानेवारीपासून

दोन दिवसीय पशु व कुक्कुट पक्षी प्रदर्शन

लातूर, दि. 18 (जिमाका):  उदगीर येथे श्री सदगुरु हावगीस्वामी महाराज यात्रेनिमित्त 27 व 28 जानेवारी 2024 रोजी जातिवंत पशुधनाचे पशु व कुक्कुट पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. उदगीर येथील नवीन बुद्ध विहार समोरील क्रीडा मैदानावर होणाऱ्या या प्रदर्शनात पशुपालकांनी आपले पशु व कुक्कुट पक्षी यांची नोंदणी करण्याचे आवाहन उदगीर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय घोणसीकर यांनी केले आहे.

देवणी जातीचे नर व मादी, लालकंधारी जातीचे नर व मादी, संकरीत जातीचे मादी, उस्मानाबादी जातीचे तीन पिल्ले व त्यावरील पिल्ले देणारी मादी, अश्व गट नर व मादी आणि कुक्कुट गटात जातीवंत कुक्कुटपक्षी यांचा या पशु व पक्षी प्रदर्शनात समावेश आहे. पशुप्रदर्शनात सहभागी होताना गोवर्गीय पशुधनास लंपी चर्मरोगाचे लसीकरण केल्याचे पशुसंवर्धन विभागाचे लस दिल्याचे प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. लंपी चर्मरोगग्रस्त असलेले व यापूर्वी लंपीचे लागण झालेले गोवर्गीय पशुधन या पशुप्रदर्शनात सहभागी करता येणार नाही.

पशुपालकांचे आधारकार्ड, बँक पासबुकची स्पष्ट दिसणारी छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. तसेच लातूर जिल्ह्याबाहेरील पशुपालकांनी पशुप्रदर्शनात सहभागी होत असताना त्यांच्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधन वाहतूक प्रमाणपत्र सोबत घेवून प्रवास करणे व ते पशुप्रदर्शनात आणने अनिवार्य आहे. या पशु प्रदर्शनासाठी पशुनोंदणी  27 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजेपासून 28 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत करण्यात येईल. यानंतर पशुप्रदर्शनाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यानंतर पशुनिवड प्रक्रिया राबवण्यात येईल, असे पशुधन विकास अधिकारी डॉ. घोणसीकर यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु