लातूर जिल्ह्यातील 1967 पूर्वीच्या लसीकरण अभिलेखात शोधणार कुणबी नोंदी

 

लातूर जिल्ह्यातील 1967 पूर्वीच्या

लसीकरण अभिलेखात शोधणार कुणबी नोंदी

·        अभिलेख तपासणीसाठी सादर करण्याच्या सूचना

लातूर, दि. 18 (जिमाका):  कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीच्या नोंदीचा शोध घेण्यासाठी 1967 पूर्वीच्या अभिलेखांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये आता जुन्या देवी लस, कॉलरा लस व इतर लसीकरणाच्या रजिस्टरमध्ये कुणबी नोंदींचा शोध घेतला जाणार आहे. या लसीकरणबाबतच्या नोंदी असलेले अभिलेख तत्कालीन पोलीस पाटील, आरोग्य सेवक किंवा इतर ग्रामस्तरीय, नागरीस्तरीय अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे असल्यास त्यांनी संबंधित गावचे ग्रामसेवक अथवा शहरातील महानगरपालिकेत जमा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

मराठवाड्यात 1967 पूर्वी देवीची लस घेतलेल्या लोकांच्या रजिस्टरमध्ये कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. लातूर जिल्ह्यातही अशा नोंदी असण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील लसीकरणाच्या रजिस्टरमध्ये कुणबी नोंदींचा शोध घेतला जाणार आहे. या अभिलेखांची तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु