लातूर येथील विशेष शिबिरात तृतीयपंथीयांची मतदार नोंदणी

 


 लातूर येथील विशेष शिबिरात तृतीयपंथीयांची मतदार नोंदणी


लातूर दि.
 5 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 च्या अनुषंगाने विशेष मतदार नोंदणी शिबीर आयाजित करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली  235- लातूर शहर मतदारसंघामध्ये लातूर तहसील कार्यालय येथे तृतीय पंथीयांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सहभागी होत तृतीयपंथीयांनी मतदार नोंदणी फॉर्म भरून दिले.

लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी आहे. निवडणूक पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुध्दीकरण अत्यंत महत्वपूर्ण असते. मतदार नोंदीमध्ये समाजातील तृतीय पंथीयांचा अल्प प्रतिसाद लक्षा घेता लातूर शहर मतदारसंघामध्ये लातूर तहसील कार्यालय यथे तृतीयपंथीय लोकांसाठी 5 जानेवारी रोजी विशेष शिबीराचे आयेाजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये उपस्थित सर्व तृतीयपंथीय लोकांचे मतदार नोंदणीचा भरुन घेण्यात आले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुचिता शिंदे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियंका आयरे, तहसीलदार सौदागर तांदळे, नायब तहसीलदार भिमाशंकर बेरुळे तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी शंकर अंगदराव जाधव यावेळी उपस्थित होते.

सर्व तृतीयपंथीयांना मतदार नोंदणी करुन लोकशाही अधिक बळकट करावी. तसेच या समाज घटकांकडे वास्तव्य आणि जन्मतारखेच्या कागदपत्रांची कमतरता लक्षात घेवून निवडणूक आयोगाने त्यांना स्व-घोषणापत्राची सवलत दिलेली आहे. त्यमुळे हे समाजातील व्यक्ती आता कोणतीही कागदपत्रे नसली, तर मतदार नोंदणी करु शकणार आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी श्रीमती नऱ्हे-विरोळे यांनी दिली. 

****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु