जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करावेत

 

जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करावेत

लातूर, दि. 16 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ आणि संत काशिबा़ गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ या दोन महामंडळाचे कामकाज सोपविण्यात आले आहे. या दोन्ही महामंडळाचे कामकाज सुरु झाले असून  राज्यातील गुरव समाज व लिंगायत समाजातील घटकांसाठी व्यापार, उद्योग, शेतीपूरक व्यवसाय तसेच व्यावसायिक व उच्च शिक्षणासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भाव येथील महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

ऑनलाईन कर्ज योजना

राष्ट्रीयकृत, नागरी, सहकारी, शेडयुल्ड तथा मल्टीशेड्युल्ड बँकाकडून घेतलेल्या कर्जाच्या दरमहा नियमित परतफेड केलेल्या हप्त्यावरील 12 टक्केपर्यंत व्याजाच्या व 5 वर्षेपर्यंतच्या मुदती कर्जावरील व्याज रकमेचा परतावा लाभार्थीस ऑनलाईन पध्दतीने बचत खात्यात महामंडळातर्फे जमा करण्यात येतो. तथापि, लाभार्थीने बँकेकडे कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी महामंडळाचे एलओआय (पात्रता प्रमाणपत्र) प्रथम घेणे अनिवार्य आहे. ऑनलाईन कर्ज योजनांसाठी महामंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज करावा.

1)    वैयक्तिक कर्ज व्याज परतावा

-   व्यापार, उद्योग, सेवा व शेतीपूरक व्यवसायासाठी लागणाऱ्या कर्जासाठी

-   कर्ज मर्यादा 10 लक्ष रुपये.

-   अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लक्ष रुपयेपर्यंत असावे.

2)   गट कर्ज व्याज परतावा योजना

-   बचत गट, भागीदारी संस्था (निबंधक मुंबई प्राधिकृत), सहकारी संस्था (जिल्हा उपनिबंधक प्राधिकृत) इ.

-   कर्ज मर्यादा 10 ते 50 लक्ष रुपये.

-   गटातील सभासदांची वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लक्ष रुपयेपर्यंत.

3)   शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

-   पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी

-   देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लक्ष रुपये.

-   परदेशी शिक्षणासाठी 20 लक्ष रुपये.

-   अभ्यासक्रम : आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसायीक व व्यवस्थापन, कृषी, अन्नप्रकिया व पशु विज्ञान

-   अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 8 लक्ष रुपयेपर्यंत.

4)  महिला स्वंयसिध्दी कर्ज व्याज परतावा योजना

-   महिला बचत गटासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधनकेंद्राच्या साहयाने राबविण्यात येईल

-   प्रथम टप्यात 5 लक्ष कर्ज घेण्यास मान्यता व सदर कर्ज परतफेडीनंतर द्वितीय टप्यात 10 लक्ष रुपये कर्ज घेण्यास पात्र.

 

ऑफलाईन कर्ज योजना

            1) थेट कर्ज योजना

-   महामंडळामार्फत 1 लक्ष रुपयेपर्यंत थेट कर्ज

-   नियमित कर्ज परतफेडीवर व्याज आकारले जाणार नाही, तथापि थकीत कर्ज रकमेवर 4 टक्के व्याज आकारले जाईल.

-   कर्ज परतफेड कालावधी 4 वर्ष (रु. 2085 मासिक हप्ता )

-   अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लक्ष रुपयेपर्यंत.

2) बीजभांडवल कर्ज योजना

- राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत राबविण्यात येते.

- कर्ज मर्यादा 5 लक्ष रुपयेपर्यंत.

- बँक मंजुर कर्ज रकमेत महामंडळ सहभाग 20 टक्के, बँकेचा सहभाग 75 टक्के व लाभार्थी

  सहभाग 5 टक्के.

- व्याज दर महामंडळ सहभागावर 6 टक्के, बँकेच्या सहभागावर प्रचलित बँक व्याज

  दरानुसार.

- अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 1 लक्ष रुपयेपर्यंत.

पात्रतेचे निकष

-   लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा

-   तो महामंडळाचा, बँकेचा अथवा कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा

-   कुंटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल

-   वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे.

-   अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्याचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा

-   कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.

-   सर्व व्याज परतावा योजनांसाठी लाभार्थीने कर्ज मंजुरीसाठी बँकेकडे जाण्यापूर्वी महामंडळाचे एलओआय (पात्रता प्रमाणपत्र) घेणे अनिवार्य आहे.

लातूर जिल्ह्यातील गुरव व लिंगायत समाजातील बांधवांनी योजनांच्या अधिक माहितीसाठी व ऑफलाईन कर्ज योजनांच्या अर्जासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, पहिला मजला, जात पडताळणी इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवनेरी गेट समोर, गुळ मार्केट, लातूर (दुरध्वनी क्र. 02482-253334) येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु