समाज कल्याण विभाग योजनांच्या जनजागृतीसाठी कलापथक संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

                                              समाज कल्याण विभाग योजनांच्या जनजागृतीसाठी

कलापथक संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

लातूर, दि. 10 (जिमाका) :  अनुसूचित जाती उपयोजना 2023-2024 अंतर्गत निधीतून लातूर जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे कलापथकाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांची जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी लातूर जिल्ह्यातील नोंदणीकृत कलापथक संस्थांनी 25 जानेवारी, 2024 रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत आपले प्रस्ताव लातूर जिल्हा माहिती कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज सादर करणाऱ्या संस्थांचे कलापथक सादरीकरण घेवून गुणांकनाच्या आधारे पाच संस्थांची निवड करण्यात येणार आहे. या संस्थामार्फत कलापथकाद्वारे योजनांची प्रसिध्दी करण्यात येईल.

अर्ज करणारी संस्था मागील तीन वर्षापासून धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असावी. संस्थेस विविध विषयावर (शासकीय योजनांसह) कार्यक्रम, पथनाट्य करण्याचा अनुभव असावा. संस्थेकडे स्वत:ची ध्वनिक्षेपण यंत्रणा असावी. संस्थेचे स्वत:चे किमान दहा जणांचे पथक असावे. ज्यात स्त्री –पुरुष कलावंत, गायक –वादक यांचा समावेश असावा. केंद्र शासनाच्या गीत व नाट्य प्रभाग, दूरदर्शन, आकाशवाणी यांच्यासाठी संस्थेने कार्यक्रम सादर केलेल्या अशा संस्थांना प्राधान्य देण्यात येईल.

प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे

संस्था नोंदणीकृत असल्यास त्याची कागदपत्रे, संस्था किती वर्षापासून कार्यक्रम सादर करत आहे. त्यांचा तपशील व पुरावे. संस्थेने एका वर्षात सरासरी किती कार्यक्रम सादर केले आहेत?त्याबाबतची माहिती व पुरावे, शासकीय योजनांसाठी कार्यक्रम केल्याचे अनुभव वर्षे आणि संख्या, आकाशवाणीवर कार्यक्रम वर्षे / संख्या . आकाशवाणीवर कार्यक्रम केल्याचा अनुभव , वर्षे संख्या त्याबाबतचे पुरावे. केंद्र शासनाच्या गीत व नाट्य प्रभाग यांच्या यादीवर पथक आहे का ? किंवा पूर्वी होते का ? संस्थेच्या पथकातील सहभागी कलाकरांच्या कलाक्षेत्रातील पूर्व अनुभव ( वर्षे, व्यक्तिगत सादरीकरण संख्या ), पथकाला किंवा पथकातील कलाकरांना मिळालेल शासकीय अथवा पथितयश पुरस्कार याबाबतचा पुरावा. पथकातील सर्व कलावंतची नावे व पत्ता अधार क्रमांक आदी माहिती, तसेच असल्यास संस्थचे गेल्या तीन वर्षातील ऑडिट रिपोर्ट सादर करावेत.

****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु