शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 ·        25 जानेवारीच्या शासन निर्णयानुसार क्रीडा प्रकारांच्या यादीत सुधारणा

लातूर, दि. 29 (जिमाका): शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार आणि उत्कृष्ट मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू, साहसी उपक्रम यासाठी देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या नियमावलीत 29 डिसेंबर, 2023 च्या शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता यामध्ये 25 जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीत सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी 31 जानेवारी 2024 पर्यंत पुणे येथील क्रीडा व युवक संचालनालय येथे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सुधारित नियमावलीनुसार पुरस्काराच्या पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीत इक्वेस्टरियन, गोल्फ, यॉटींग, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अॅण्ड स्नुकर, सॉफ्टबॉल (पुरूष) व बेसबॉल (महिला) या खेळांचा समावेश करण्यास व मॉडर्न पेंटॅथलॉन या खेळामध्ये गुणांकन करताना टेट्राथलॉन या उपप्रकाराचा विचार शिवछत्रपती  क्रीडा पुरस्कार 2022-23 मध्ये करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार याच खेळांमधील खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांनी त्यांचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. तसेच जिम्नॅस्टीक्स या क्रीडा प्रकारामधील एरोबिक्स तथा अॅक्रोबॅटिक्स क्रीडा प्रकारातील खेळाडू व मार्गदर्शकांनी देखील ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत.

पुरस्कारासाठी अर्जाचा नमुना क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे उपलब्ध असून व्यवस्थित भरलेले अर्ज याच ठिकाणी 31 जानेवारी, 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्ज स्वीकारण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे कार्यालय कार्यालयीन वेळेत सुट्टीच्या दिवशी देखील सुरू ठेवण्यात येत असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु