महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी 31 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी

31 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

लातूर, दि. 17 (जिमाका) : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार नियमावलीचा शासन निर्णय दिनांक  08  मार्च 2019 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यानुसार या पुरस्कारासाठी 31 जानेवारी 2024  पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक एस. एन. चिकुर्ते यांनी केले आहे.

वीरशैव-लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, अध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थांच्या कामाची दाद, दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी. यासाठी समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावून पुढे यावेत, यासाठी एका व्यक्तीला व एका सामाजिक संस्थेला असे एकूण दोन पुरस्कार देण्यात येतात.

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी जिल्ह्यातील इच्छुक व्यक्ती व संस्था यांनी  31 जानेवारी 2024 पर्यंत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, लातूर यांच्या कार्यालयामध्ये सीलबंद लिफाफ्यात आपले विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. या पुरस्कारासाठी पात्रतेबाबतची नियमावली 8 मार्च 2019 च्या शासन निर्णयासोबत जोडण्यात आली आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच विहीत नमुन्याततील अर्ज सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, लातूर यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु