नशामुक्त भारत अभियान व संविधान जागर कार्यशाळचे लातूर येथे शुक्रवारी आयोजन

                                            नशामुक्त भारत अभियान व संविधान जागर कार्यशाळचे

लातूर येथे शुक्रवारी आयोजन

लातूर, दि. 03 (जिमाका) : विद्यार्थ्यांमध्ये समाजभान निर्माण व्हावे, म्हणून समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त कार्यालयामार्फत लातूर विभागातील महाविद्यालयांचे प्राचार्य, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, वसमिगृहांचे गृहपाल यांच्यासाठी शुक्रवार, 5 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 11 वाजता लातूर येथील दयानंद सभागृहात नशामुक्त भारत अभियान व संविधान जागर कार्यशाळचे आयोजन करण्यात आलेले आहे.

काळानुरुप विविध संस्थमेध्ये तसेच कुटूंब व्यवस्थेमध्ये बदल झालेले आहेत. दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक यांच्याबाबतीत सर्वांनी संवेदनशील होणे गरजेचे आहे. तसेच संविधानाप्रती व देशाप्रती प्रत्येकाने जबाबदार होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी, यादृष्टीने या कार्यशाळेमध्ये संविधान जागृती, तृतीयपंथीयांच्या समस्या व अंधश्रध्दा निर्मुलन या विषयावर तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी असतील. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे डॉ. राजेश शिंदे , विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाने उपस्थित राहणार आहेत.

याप्रसंगी श्रीमती प्रा. सविता शेटे यांचे अंधश्रध्दा निर्मुलन-जागृती, प्रा. डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे यांचे संविधान वाचन-गरज, नंदकुमार फुले यांचे दिव्यांग व्यक्ती-अडचणी आणि समाजाचे दायित्व, डॉ. बी.आर. पाटील यांचे ज्येष्ठ नागरिक व्यथा आणि उपचार जागृती, प्रा. डॉ. अनिल जायभाये यांचे तृतियपंथी आणि समाज भान व डॉ. विजयकुमार यादव हे व्यसनमुक्ती जागृती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेस लातूर विभागातील महाविद्यालयांचे प्राचार्य, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, वसतिगृहांचे गृहपाल यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त यांनी अविनाश देवसटवार यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु