चार वर्षांच्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी 20 जानेवारी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

चार वर्षांच्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी

20 जानेवारी अर्ज सादर करण्याचे आवाहन

लातूर, दि. 17 (जिमाका):  राज्याचे युवा धोरण 2012 अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने शासन निर्णय 12 नोव्हेंबर 2013 अन्वये जिल्ह्यात कार्यरत असलेल्या युवक व युवतींना व नोंदणीकृत संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा आणि युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी युवक, युवती आणि संस्थांना जिल्हा युवा पुरस्कार दिला जातो.

त्यानुसार 2019-20, 2020-21, 2021-22 आणि 2022-23 या चार वर्षातील जिल्हा युवा पुरस्कारासाठी जिल्ह्यातील युवक, युवती तसेच नोंदणीकृत संस्थांनी 20 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जंगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

अर्जाचा विहित नमुना लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून प्राप्त करून घ्यावा. अधिक माहीतीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे (भ्रमणध्वनी क्र. 9975576600) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. लकडे यांनी केले आहे.

******

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु