लातूर येथे सैनिकी मुलींच्या वसतिगृहासाठी अशासकीय सहायक अधीक्षिका पदाची होणार भरती

 

लातूर येथे सैनिकी मुलींच्या वसतिगृहासाठी

अशासकीय सहायक अधीक्षिका पदाची होणार भरती

लातूर, दि. 16 (जिमाका):  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या आस्थापनेवरील लातूर येथील सैनिकी मुलींचे वसतिगृहासाठी अशासकीय सहायक अधीक्षिका पद तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधन प्रतिमाह 23 हजार 283 प्रमाणे भरण्यात येणार आहे.

 या पदासाठी इच्छुक माजी सैनिक पत्नी अथवा विधवा, सेवारत सैनिकांच्या पत्नी यांनी 29 जानेवारी 2024 रोजी स्वतः अर्ज व मूळ कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सैनिक संकुल, एम.आय.टी. मेडिकल कॉलेज समोर, अंबाजोगाई रोड, लातूर येथे उपस्थित राहावे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारास तात्काळ कामावर घेण्यात येणार असल्याचे लातूरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी कळविले आहे.

*****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु