मोदी आवास घरकुल योजनेसाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

मोदी आवास घरकुल योजनेसाठी

31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लातूर, दि. 16 (जिमाका):  इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या 28 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाने इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना सुरु केलेली आहे. या योजनेंतर्गत राज्यात तीन वर्षात 10 लाख घरे पूर्ण करण्याचे  उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.

इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील आवास प्लस मधील प्रतिक्षा यादीत नाव असलेल्या तथा आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु स्वयंचलित प्रणालीद्वारे अपात्र झालेल्या पात्र लाभार्थ्यांनी प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा यांनी निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार लातूर जिल्ह्यातील इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांनी मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ घेवू इच्छिनाऱ्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपले अर्ज संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्यामार्फत 31 जानेवारी, 2024 पर्यंत सादर करण्याचे असे अवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु