इयत्ता दहावी परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध; शाळांनी प्रवेशपत्र प्रिंट काढून विद्यार्थ्यांना देण्याचे आवाहन

 

इयत्ता दहावी परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध;

शाळांनी प्रवेशपत्र प्रिंट काढून विद्यार्थ्यांना देण्याचे आवाहन

 

लातूर, दि. 31 (जिमाका): सर्व विभागीय मंडळातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च- 2024 साठी प्रवेशित विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र संकेतस्थळावर ‘स्कूल लॉगीन’मध्ये ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व माध्यमिक शाळांनी हे प्रवेशपत्र प्रिंट कडून विद्यार्थ्यांना द्यावीत, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कळविले आहे.

 

प्रवेशपत्र उघडताना काही त्रुटी (एरर) असल्यास हे प्रवेशपत्र गुगल क्रोममध्ये उघडावे. प्रवेशपत्र प्रिंट काढून देताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेवू नये. प्रवेशपत्र प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रात विषय व माध्यम बदल असतील तर त्याच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जावून करून घ्याव्यात. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, जन्मस्थळ यासंदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवावी. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यर्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देवून विद्यार्थ्यास प्रवेशपत्र द्यावे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु