मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात सहभाग नोंदविण्याचे आवाहन

 मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात सहभाग नोंदविण्याचे आवाहन

 

लातूर दि. 1 (जिमाका) :  राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळेमधील शिक्षक पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी 30 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतंर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वीपणे राविण्यासाठी व सर्वाचा सहभाग मिळविण्यासाठी हा स्पर्धात्मक कार्यक्रम शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांनी केले आहे.

अभियानाची उद्दिष्ट्ये, कालावधी स्वरुप घटक व गुणदान याबाबत सहभागी शाळाच्या कामगिरीच्या आधारे मुल्यांकन करण्यात येणार असून स्तरनिहाय स्पर्धेचे स्वरूप व पारितोषकाची रक्कम 30 जानेवारी, 2023 च्या शासन मधील तरतुदीनुसार आहे. यानुसार विभागातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी अंमलबजावणी करावी. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणानी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. मोरे यांनी केले आहे.

 

*****

 


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु