स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जिल्हा प्रशासन राबविणार लातूर जिल्हा शाश्वत विकास प्रकल्प

                                         स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जिल्हा प्रशासन

राबविणार लातूर जिल्हा शाश्वत विकास प्रकल्प

·        स्वयंसेवी संस्था, व्यक्तींनी 5 फेब्रुवारीपर्यंत माहिती पाठविण्याचे आवाहन

लातूर, दि. 24(जिमाका) : लातूर जिल्हा प्रशासन विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने लातूर जिल्हा शाश्वत विकास प्रकल्प राबविणार आहे. या अंतर्गत लातूर जिल्ह्यात पर्यावरण संवर्धन, अपारंपारिक ऊर्जा, जलसंधारण व जलपुर्न:भरण, नैसर्गिक शेती, पशुसंवर्धन, लघुउद्योग व कुटरउद्योग, घनकचरा व्यवस्थापन व महिला आरोग्य व सक्षमीकरण या क्षेत्रातील शासकीय योजना राबविण्यात येणार आहेत.

हा प्रकल्प प्रभावी व कार्यक्षमरित्या राबवून लातूर जिल्ह्याचा विकास पॅटर्न तयार करण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था, व्यक्ती यांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. लातूर जिल्ह्यात या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, व्यक्ती यांनी या प्रकल्पात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

स्वयंसेवी संस्था, व्यक्ती यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अद्यापपर्यंत केलेल्या कामाबाबतची माहिती laturdsdp@gmail.com या ई-मेल आयडीवर 5 फेब्रुवारी, 2024 पर्यंत पाठवावी. या प्रकल्पासाठी उपजिल्हाधिकारी नितीन विजयकुमार वाघमारे यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे नियोजनाचे बैठकीत या सामाजिक संस्था, व्यक्ती आमंत्रित करण्यात येईल व कार्यक्रमाची आखणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

                                                  *****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु