क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

 

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

लातूर, दि. 25 (जिमाका): राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे 26 जानेवारी 2026 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

ना. बनसोडे हे सकाळी 8.50 वाजता शंकुतला निवासस्थान येथून लातूर जिल्हा क्रीडा संकुलकडे प्रयाण करतील. याठिकाणी सकाळी 9.15 वाजता त्यांच्या उपस्थितीत 75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित मुख्य शासकीय ध्वजारोहण होईल. सकाळी 10.05 वाजता त्यांच्या उपस्थितीत जिल्हा क्रीडा संकुल येथे ग्रामीण भागातील महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री 2023-24 ‘हिरकणी हाट’चा उद्घाटन सोहळा होईल. दुपारी 12.30 वाजता ते लातूर येथून मोटारीने उदगीरकडे प्रयाण करतील.

उदगीर येथील श्री. गुरु हवागी स्वामी गल्ली येथील श्री सदगुरु संस्थान उदगीरतर्फे हावगी स्वामी महाराज मठ येथे महामंगल आरती व दर्शन कार्यक्रमास दुपारी 1.45 वाजता ना. बनसोडे उपस्थित राहतील. दुपारी 3 वाजता उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी येथील विकास माधव केंद्रे यांच्या सरस्वती ऑटोमोबाईल अँड हार्डवेअरच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 4.15 वाजता ईस्मालपूर येथे इस्माईल खादरी दर्गा उरूस यात्रेस सदिच्छा भेट देतील. सायंकाळी 5 वाजता शेल्हाळ पाटी येथील महाकाल रेडिमिक्स कॉन्क्रेट प्लांटच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायंकाळी 6.30 वाजता उदगीर येथून लातूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी 7.30 वाजता लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवरील कार्निव्हल रिसोर्ट येथे डॉ. अशोक पोद्दार यांच्या कौटुंबिक कार्यक्रमास उपस्थित राहतील. सोयीनुसार शकुंतला निवासस्थानाकडे प्रयाण करतील.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु