जी.डी.सी.अँड ए आणि सी.एच.एम. परीक्षा 2023 चा निकाल घोषित

 जी.डी.सी.अँड ए आणि सी.एच.एम. परीक्षा 2023 चा निकाल घोषित

            लातूर, दि. 10 (जिमाका) : सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयामार्फत जी.डी.सी.अँड ए आणि सी.एच.एम 2023 परीक्षेचा निकाल https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर परीक्षार्थींना लॉगइन व पासवर्ड वापरुन पाहता येईल. तसेच पीडीएफ फॉरमॅटमध्ये हा निकाल 22 डिसेंबर, 2023 पासून https://sahakarayukta.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर 'महत्वाचे दुवे' मधील जी.डी.सी.ॲण्ड ए. मंडळ येथे पहावयास उपलब्ध राहील.

फेरगुणमोजणी करण्यासाठी परिक्षार्थींना 23 जानेवारी, 2024 पर्यंत  https://gdca.maharashtra.gov.in या वेबसाईटवर परिक्षार्थ्यांना लॉगइन व पासवर्डचा वापर करून अर्ज करता येईल. फेरगुणमोजणी करण्यासाठी परिक्षार्थीं यांनी फेरगुणमोजणी शुल्क भारतीय स्टेट बँक (एसबीआय) या बँकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्येक विषयासाठी 75 रुपये फी अधिक बँक चार्जेस याप्रमाणे चलनाद्वारे भरावे. बँकेचे चलन ऑनलाईन प्राप्त करून घेण्याची मुदत 23 जानेवारी, 2024 रोजी रात्री 10.30 पर्यंत राहील. 23 डिसेंबर, 2023 ते 25 जानेवारी, 2024 दरम्यान बँकेचे कामकाजाचे वेळेत चलन बँकेत पर्यंत भरणा करावे. विहीत तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जावर विचार करण्यात येणार नाही, असे लातूरचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा जी.डी.सी.अँड ए परीक्षेचे चीफ कंडक्टर यांनी कळविले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु