डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीचे ईआर-1 प्रमाणपत्र 30 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन

 

डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीचे ईआर-1 प्रमाणपत्र

30 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन

लातूर, दि. 18 (जिमाका):  सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) कायदा 1959 अन्वये कलम 5 मधील तरतूदीनुसार शासकीय अथवा निमशासकीय अथवा खाजगी आस्थापनेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सांख्यिकी माहितीचे तिमाही विवरणपत्र ईआर-1 प्रत्येक तिमाही संपताच पुढील 30 दिवसाचे आत सादर करणे आस्थापनेस बंधनकारक आहे. त्यानुसार सर्व आस्थापनांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने 30 जानेवारी, 2024 पर्यंत हे विवरणपत्र भरण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

ऑनलाईन विवरणपत्र भरताना काही तांत्रिक अडचणी येत आल्यास संबंधित उद्योजक, आस्थापना यांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या 02382-299462 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु