दहावी, बारावी परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची हेल्पलाईन सुरु

 

दहावी, बारावी परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची हेल्पलाईन सुरु

 

लातूर, दि. 31 (जिमाका): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागीय शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च-एप्रिल मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेसाठी हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 दरम्यान होणारी इयत्ता बारावी परीक्षा आणि 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत होणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी ही हेल्पलाईन कार्यान्वित राहील.

 

प्र. सहसचिव तथा सहायक सचिव ए. आर. कुंभार (भ्रमणध्वनी क्र. 9405077991) यांची हेल्पलाईनसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. इयत्ता बारावी परीक्षेसाठी एन. एन. डुकरे (भ्रमणध्वनी क्र. 8379072565), एम. यु. डाळिंबे (भ्रमणध्वनी क्र. 9423777789), एस. जी. आरसूलवाड (भ्रमणध्वनी क्र. 7767825495) आणि इयत्ता दहावीसाठी ए. पी. चवरे (भ्रमणध्वनी क्र. 9421765683), एस. एल. राठोड (भ्रमणध्वनी क्र. 8830298158), ए. एल. सूर्यवंशी (भ्रमणध्वनी क्र. 7620166354) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

लातूर जिल्ह्यासाठी समुपदेशक म्हणून जे. एम. वारद (भ्रमणध्वनी क्र. 9850695303), एम. एस. दानाई (भ्रमणध्वनी क्र. 9422015152), ए. एम.जाधव (भ्रमणध्वनी क्र. 9421379911), एम.एन. वांगस्कर (भ्रमणध्वनी क्र. 9420872884), डी.डी. जाधव (भ्रमणध्वनी क्र. 9923677078) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु