प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान अंतर्गत बँक ऑफ बडोदामार्फत 60 पोषण आहार कीटचे वितरण

 

प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान अंतर्गत

बँक ऑफ बडोदामार्फत 60 पोषण आहार कीटचे वितरण

लातूर,दि.31 (जिमाका): जिल्ह्यात प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत क्षयरुग्णांना उपचार काळात पोषक आहार मिळावा, यासाठी स्वंयसेवी संस्था, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांच्या सहभागाने पोषण आहार कीटचे वितरण करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बँक ऑफ बडोदाच्या सीएसआर निधीतून 26 जानेवारी 2024 रोजी 60 क्षयरुग्णांना पोषण आहार कीटचे वितरण करण्यात आले.

 

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एम. एन. तांबारे यांना पोषण आहार कीट सुपूर्द केल्या. बँक ऑफ बडोदाचे बँक व्यवस्थापक एन. एम. पाटील आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

 

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजने अंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपचारावर असणाऱ्या सर्व क्षयरुग्णाचे उपचार यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी रुग्णांना अतिरिक्त मदत करण्याकरिता क्षयरुग्णांना प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानच्या माध्यमातून जिल्ह्यात स्वंयसेवी संस्था, सामाजिक संस्था, दानशुर व्यक्ती यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने यावेळी करण्यात आले.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु