अनुकंपा नियुक्तीची प्रकरणे तातडीने निकाली काढा खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांना परिपूर्ण प्रस्ताव सादरकरण्याचे आवाहन 

अनुकंपा नियुक्तीची प्रकरणे तातडीने निकाली काढा खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांना परिपूर्ण प्रस्ताव सादरकरण्याचे आवाहन  लातूर, दि. १९ (जिमाका) : खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमध्येसेवेत असताना निधन झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना अनुकंपानियुक्तीचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी संबंधित शैक्षणिक संस्थांनी परिपूर्ण प्रस्तावतातडीने सादर करावेत, असे आवाहन पुणे येथील शिक्षण संचालनालय (योजना) चे शिक्षण उपसंचालककृष्णकुमार पाटील यांनी केले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २७ जानेवारी २०२६ रोजी अनुकंपानियुक्तीची सुधारित योजना लागू केली आहे. त्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीबाबत ४ जून२०२६ रोजी स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सुधारित धोरणानुसार पात्र लाभार्थ्यांची प्रकरणेविहीत कालमर्यादेत निकाली काढण्यासाठी शिक्षण विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यकनिर्देश दिले आहेत. प्रस्ताव सादर करताना दक्षता आवश्यक अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराने शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट‘क’ मधील विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यकआहे.संबंधित संस्थांनी प्रस्तावाची प्राथमिक छाननी करावी. प्रस्तावविहीत कालमर्यादेत प्राप्त झाला आहे का, त्यासोबत आवश्यक कागदपत्रे, माहिती व नोंदीपूर्ण आहेत का, याची खात्री करावी. त्यानंतर परिपूर्ण प्रस्ताव संबंधित जिल्ह्यातीलशिक्षणाधिकारी (योजना) यांच्याकडे कोणताही विलंब न करता सादर करावा. अपूर्ण अथवा त्रुटीपूर्ण प्रस्तावांमुळे प्रकरणाच्या कार्यवाहीसविलंब होऊ शकतो. त्यामुळे प्रस्ताव सादर करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची व नोंदींचीकाळजीपूर्वक पडताळणी करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक व संस्थाचालकांची आहे. प्राप्त प्रस्तावांची शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद कार्यालयामार्फतशासनाने निश्चित केलेल्या अटी व शर्तीनुसार छाननी व पडताळणी करण्यात येईल. २७ जानेवारी२०२६ नंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर शिक्षणाधिकारी (योजना) यांच्यामार्फत कार्यवाहीकरण्याबाबत शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. ३१ ऑगस्टपर्यंत कार्यवाही पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील पात्र लाभार्थ्यांना ३१ ऑगस्ट२०२६ पर्यंत अनुकंपा नियुक्तीचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेआहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांमध्ये अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी सर्व संबंधितांनीआपापल्या स्तरावरील कार्यवाही प्राधान्याने व कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावी. अनुकंपा नियुक्तीचा लाभ संबंधित पात्र कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे.सुधारित धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळवून देणेही सर्व संबंधितांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी, मुख्याध्यापक व संबंधित शैक्षणिक संस्थांनीअनुकंपा नियुक्तीची प्रलंबित प्रकरणे आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण करून परिपूर्ण प्रस्तावतातडीने सादर करावेत, असे आवाहन पुणे शिक्षण संचालनालय (योजना) चे शिक्षण संचालक कृष्णकुमारपाटील यांनी केले आहे. **** 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास