रेणापूर तालुक्यातील अवैध सावकारांविरुद्ध गोपनीय तक्रारी नोंदवण्याचे सहायक निबंधकांचे आवाहन

रेणापूर तालुक्यातील अवैध सावकारांविरुद्ध गोपनीय तक्रारी नोंदवण्याचे सहायक निबंधकांचे आवाहन लातूर, दि. ३० (जिमाका) : रेणापूर तालुक्यातील विनापरवाना अवैध सावकारी व्यवहारांसंबंधीच्या तक्रारींच्या चौकशीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत रेणापूर तालुक्यातील नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. रेणापूर तालुक्यातील अवैध सावकारी व्यवहारांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याकरिता सहकारी विभागाचे जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कार्यालयाकडे गोपनीय स्वरूपात तक्रार दाखल करून अशा व्यक्तींची माहिती द्यावी, असे या आवाहनात म्हटले आहे. आवाहन करण्यात आले आहे. या प्रक्रियेत तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल आणि प्राप्त माहितीच्या आधारे संबंधित अवैध सावकारांवर तात्काळ आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची तालुक्यातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेणापूर येथील सहकारी संस्थेचे सहायक निबंधक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत