सिनेअभिनेते रितेश देशमुख निर्मित ' येलो ' चित्रपटाचा दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतला आनंद
सिनेअभिनेते रितेश देशमुख निर्मित ' येलो ' चित्रपटाचा दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतला आनंद लातूर दि.1 ( जिमाका ):- जिल्हा परिषद लातूर व सिध्दीविनायक प्रतिष्ठाण लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ऑटीझम (स्वमग्नता) जाणीवजागृती सप्ताह निमित्त नुकतेच पीव्हीआर टॉकीजमध्ये सिने अभिनेते रितेश देशमुख निर्मित 'येलो' चित्रपटाच्या विनामुल्य आयोजन करण्यात आले होते. या चित्रपटासाठी 436 आसनाचे चित्रपटगृह उपलब्ध करुन देण्यात आले असुन, यामध्ये बहुसंख्येनी दिव्यांग विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी उर्त्स्फुतपणे सहभाग नोंदविला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला. या चित्रपटास जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सुनील खमितकर, दिव्यांग विभागाचे राजू गायकवाड, डॉ.प्रशांत उटगे, किरण उटगे, उमंग येथील सर्व कर्मचारी, तसेच समाज कल्याण विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. ** ****