सन 2018 -19 शेतीनिष्‍ठ चाकूर तालुक्यातील लिंबाळवाडीचे नागनाथ पाटील यांना

वसंतराव नाईक शेती निष्ठ शेतकरी पुरस्कार त्यांची ही यशकथा अनेक शेतकऱ्यांना दिशा देणारी

 

विकसित तंत्रज्ञानाची कास धरली आणि समृद्धी आली...

 


लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील लिंबाळवाडी पो. नळेगाव येथील रहिवाशी नागनाथ भगवंत पाटील वय 37 वर्षे, शिक्षण एम.ए. बी.एड . यांना नुकताच वसंतराव नाईक शेतीनिष्‍ठ शेतकरी पुरस्‍कार सन 2018 -19 शेतीनिष्‍ठ पूरस्‍कार  महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून जाहीर झाला आहे.

शेतकरी नागनाथ भगवंत पाटील यांनी स्वत:च्या शेतात राबविलेले उपक्रम अनेकांसाठी प्रेरणा आहेत.


त्यांनी पहिल्यांदा शेतकरी गट स्‍थापना केला.शेतकरी गटाच्‍या माध्‍यमातून शेती विषयक योग्‍य मार्गदर्शन तसेच आधुनिक पध्‍दतीने शेती करण्यामुळे तोट्यातली शेती फायद्यात येऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले.

    2018 - 19 मध्ये त्यांनी पपईच्‍या आधुनिक लागवड केली  त्याची तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती देखभाल केली त्यामुळे एकरी 60 टन उत्पादन झाले.  शेतामध्‍ये ते नियमित जीवामृतचा वापर करतात ..हळद, ऊस,पपई ,मिरची,टोमॅटो इत्‍यादी पिकांची रोपे स्‍वतः तयार करत असल्यामुळे कोणतं पीक कसं घ्यावे याचे योग्‍य नियोजन करतात. सिंचन सुविधेत त्यांच्याकडे बोअर व शेततळे आहे. पण कोणत्या पिकाला किती पाणी लागते हे त्यांनी अभ्यासातून आत्मसात केले आहे. त्यामुळे त्यांनी  भाजीपाला क्षेत्रात मोठया प्रमाणात वाढ केली आहे. काढणी झाल्या नंतरही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन सिमला मिरची 10 किलोची पॅकिग, आंबा व पपईची सुद्धा योग्य ती प्रतवारी करुन ते विकतात.  या उत्‍पादीत मालाची विक्री जिल्‍हास्‍तर ,राज्यस्तर व देशभरामध्‍ये तसेच शेतावर व कृषि बाजार समिती, बागवान मार्फत करतात. इंटरनेटच्‍या माध्‍यमातुन गावात हवामान अंदाज अगदी अचुक रित्‍या ब-याच शेतकऱ्यापर्यंत पोहचिवतात. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर अगदी योग्‍य प्रमाणात होतो.. शेतीबरोबरच गावामध्‍ये 205 झाडांची ट्रीगार्डसहीत डॉक्टर ग्रुप व गावक-यांच्‍या मदतीने 2018 मध्‍ये लागवड केली व संगोपन  करुन त्याची स्‍वतः देखभाल करतात..कृषि विद्यापीठात,प्रगतशिल शेतक-याच्‍या प्रक्षेत्रावर भेटी, कृषी प्रदर्शन, भेटी, ॲग्रोवन वाचन दूरदर्शनवरील तसेच साम टीव्‍ही , एबीपी माझा वरील शेती विषयक सर्व कार्यक्रम सातत्‍याने पाहून तंत्रज्ञान आत्‍मसात करण्‍यावर भर आहे. अशी मेहनत, वेगळेपण  करण्याची जिद्द असेल तर शेतीत अनेक यशस्वी प्रयोग करून शेती यशस्वी करता येऊ शकते हे नागनाथ पाटील यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या मेहनतीला शासनाच्या या पुरस्काराने मोहर उमटविली आहे. त्यांची ही कहानी इतरांना प्रेरणा देणारी आहे.

                                                                                                           --- युवराज पाटील,

                                                                                                           जिल्हा माहिती अधिकारी,

लातूर

****   




Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा