दुग्ध व्यवसाय प्रशिक्षणाचा निरोप समारंभ

 

दुग्ध व्यवसाय प्रशिक्षणाचा निरोप समारंभ

 

           * लातूर,दि.28 (जिमाका):-* भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18 एप्रिल 2022 ते दि. 27 एप्रिल 2022 या दहा दिवसाच्या कालावधीत बँच नंबर 252 दुग्ध व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

           निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ईबुतवार आर बी (संचालक) प्रमुख पाहुणे शिवकुमार झा (भारतीय स्टेट बँक विभागीय महा व्यवस्थापक) डाँ चंदेल (जाँईट कमिशनर पशु संवर्धन विभाग) डाँ. राजकुमार पडीले  (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद लातुर) कराळे  बोरगावकर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवकुमार झा म्हणाले की, आपण गाईला देव मानतो पण बहुतांश ठिकाणी स्वच्छता नसते मग जिथे दुग्ध व्यवसाय करणार आहोत तेथे स्वच्छता असने गरजेचे आहे. कारण स्वच्छता शिवाय आपला व्यवसाय वाढु शकत नाही म्हणून दुग्ध व्यवसायात प्रत्येक बाबी मध्ये स्वच्छता असेल तर स्वतः प्रगती होऊन गावचा व लातुरचा व देशाचा विकास होईल असे म्हटले व कार्यक्रमाचे अध्यक्ष  ईबुतवार आर बी (संचालक) म्हणाले की  दुग्ध व्यवसाय हा कष्टकरी व्यक्ति चा आहे.

           कष्ट जो करेल तो पुढे जाणार  आरसेटी ही उद्योगाचेच धडे देत नाही तर या देशाचा सुनागरीक सुविचारांचा बनला पाहिजे मुलगा- मुलगी समान अशी   मानसिकता तयार करुन यशस्वी उद्योजक घडविण्यासाठी प्रयत्न करतो. या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश डी कांबळे यांनी  मानले तर प्रस्तावित सुतार सुधाकर यांनी मानले तर आभार घोडके अशोक यांनी मानले.यावेळी शालीनी येरटे व प्रशिक्षणार्थी महिला पस्तीस उपस्थित होत्या.      

                                                       0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु