केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडे आर्थिक मदतीची प्रकरणे ऑन लाईन पाठवावेत

 

केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडे

आर्थिक मदतीची प्रकरणे ऑन लाईन पाठवावेत

            *लातूर,दि.28,(जिमाका):-* माजी सैनिक/विधवांचे पाल्यासाठी केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडे सन 2022-2023 साठी RMDF/AFFDF मधुन आर्थिक मदत मिळण्यासाठी अर्ज सादर करणेबाबत हवलदार पदापर्यंतच्या माजी सैनिक/माजी सैनिकांच्या विधवांच्या पाल्यांना केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचे RMDF मधुन शैक्षणिक आर्थिक मदत देण्याची तरतुद आहे. ऑनलाईन  प्रकरणे सादर करावयाच्या तारखा पूढीलप्रमाणे आहेत .

आर्थिक मदत, वर्ष/तारीख/इयत्ता, अंतिम तारीख पूढील प्रमाणे आहे. चरितार्थासाठी आर्थिक मदत, दिनांक ०१ एप्रिल रोजी वय वर्ष ६५ व पेंशन नसलेले माजी सैनिक व विधवा साठी वार्षिक रु. ४८ हजार  सन २०२२-२०२३ (आरंभीसाठी) ३१ मार्च २०२३, सन २०२२-२०२३ (नुतनीकरणासाठी) ०१ डिसेंबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ . शिक्षणाची आर्थिक मदत पहिल्या व दुस या पाल्यास रु. १२ हजार  पर्त्येकी  पहिली  ते नववीअकरावी ३० सप्टेंबर २०२२, दहावी व बारावी ३१ ऑक्टोबर २०२२ , B.A., B. Com., BSc  पदवीधर (व्यावसायिक शिक्षण व्यतिरीक्त) ३० नोव्हेंबर २०२२.

मुलीच्या लग्नाची आर्थिक मदत एक मुलीच्या लग्नासाठी रु. ५० हजार  विवाहाची तारीख लग्नानंतर १८० दिवसाच्या आत. अनाथ मुलासाठी आर्थिक मदत वार्षिक रु. १२ हजार अंतिम पालकांच्या मृत्युनंतर (आरंभीसाठी) मुदत नाही. सन २०२२-२०२३ (नुतनीकरणासाठी) ०१ डिसेंबर २०२२ ते ३१ मार्च २०२३. शंभर टक्के मतिमंद/अपंग पाल्यासाठी आर्थिक मदत वार्षिक रु. १२ हजार  आरंभीसाठी मुदत नाही, सन २०२२-२०२३ (नुतनीकरणासाठी) ०१ डिसेंबर २०२२ ते ३१ मार्च २०२३. वैद्यकिय मदत रु. ३० हजार पर्यंत व गंभीर आजार रु. १ लाख २५ हजार  पर्यंत हॉस्पिटलामधुन डिस्चार्ज झाल्याचा दिनांक हॉस्पिटलमधुन डिस्चार्ज तारखेपासून १८० दिवसाच्या आत. गतिशीलता उपकरणे (Mobility equipment) मुदत नाही.

गृह कर्जावर सबसिडी  बॅंकेकडुन कर्ज मंजुर झालेली तारीख बॅंकेने कर्ज मंजुर केलेचे तारखेपासून १८० दिवसाच्या आत. व्यावसायिक प्रशिक्षण व्यावसायिक कोर्स पुर्ण झालेची तारीख व्यावसायिक कोर्स पुर्ण केलेल्या तारखेपासून १८० दिवसाच्या आत.

तसेच माजी सैनिकांनी त्यांचे डिस्चार्ज पुस्तक व पाल्यांचे गुणपत्रकांचे आधारे आवेदन हे बिनचुक सादर करणे अनिवार्य राहील याची नोंद घ्यावी. तरी पात्र व इच्छुक माजी सैनिकांच्या पाल्यांनी उपरोक्त विहीत मुदतीत आवेदन सादर करुन जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, विजयकुमार ढगे यांनी केले आहे.

 

                                                       000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा