महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क संयुक्त पूर्व परीक्षा-2021 च्या परीक्षा केंद्राच्या 100 मिटरच्या परीसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क संयुक्त पूर्व परीक्षा-2021 च्या

परीक्षा केंद्राच्या 100 मिटरच्या परीसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

 

        *लातूर दि.1(जिमाका)* रविवार दिनांक- 03 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2021 ही लातूर शहरातील विविध 25 उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी फौजदारी प्रक्रियासंहिता 1973 चे कलम 144 अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन उक्त परीक्षा केंद्राच्या 100 मिटरच्या परिसरात पूढील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

        शहरात निश्चित करण्यात आलेल्या परीक्षा केंद्राचा तपशील पूढीलल प्रमाणे आहे.

           1) देशीकेंद्र विद्यालय सिग्नल कॅम्प लातूर 2) यशवंत विद्यालय, नांदेड रोड लातूर 3) संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय अंबाजोगाई रोड लातूर 4) जिजामाता कन्या प्रशाला नांदेड रोड लातूर 5) परिमल विद्यालय नारायण नगर लातूर, 6) सरस्वती विद्यालय खाडगांव रोड प्रकाशनगर लातूर, 7) पोद्दार इंटरनॅशनल स्कूल दिलीप मानेनगर खाडगांव रिंगरोड लातूर, 8) श्री शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक विदयालय, सरस्वती कॉलनी, लातूर 9) एम.एस. बिडवे इंजिनिअरींग कॉलेज, बाशी रोड, लातूर, 10) गोदावरी लाहोटी कन्या विद्यालय दयाराम रोड लातूर, 11) ज्ञानेश्वर विद्यालय शाहू चौक नांदेड रोड लातूर, 12) राजर्षी शाहू वाणिज्य महाविद्यालय बस स्टैंड समोर लातूर,  13) दयानंद विज्ञान महाविद्यालय बार्शी रोड लातूर, 14) दयानंद वाणिज्य महाविद्यालय बार्शी रोड लातूर, 15) श्री. व्यकंटेश विद्यालय शिंगणाप्पा गल्ली लातूर, 16) श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय, खाडगांव रोड लातूर 17) श्री. रविशंकर विद्यामंदीर खाडगांव रिंग रोड लातूर, 18) श्री. मारवाडी राजस्थान विद्यालय, सिग्नल कॅम्प लातूर, 19) पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन औसा रोड लातूर, 20) दयानंद कला महाविदयालय, बार्शी रोड, लातूर 21) राजमाता जिजामाता ज्युनिअर कॉलेज,शिव नगर, सुतमिल रोड, लातूर,22) राजर्षी शाहु विज्ञान महाविद्यालय, बस स्टँडसमोर, लातूर 23) राजर्षि शाहू कला महाविद्यालय, बस स्टँड समोर लातूर,24) जयक्रांती माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय, सिताराम नगर, लातूर, 25) केशवराज विद्यालय श्याम नगर लातूर या उपकेंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने उक्त परीक्षा केंद्राच्या परीसरात मोठया प्रमाणावर परीक्षार्थी येणार आहेत.

परीक्षा केंद्राचे परिसरात प्रवेश करते वेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्राचे परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. 100 मीटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपींग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसरमाध्यमे घेऊन करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेश मनाई राहील.

हे आदेश परीक्षा केंद्रावर कामकरणारे अधिकारी /कर्मचारी परीक्षार्थी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे बाबत त्या परीक्षासंबंधी कर्तव्ये पारपाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाहीत. सदरिल आदेश दि. 3 एप्रिल,2022 (रविवार) रोजी सकाळी 9.00 ते दुपारी  1.00 वाजे पर्यंत लागू राहातील. असे ही आदेशात नमुद केले आहे.

 

                                            ****

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु