क्रिडा संकूल येथे जेष्ठ नागरीक जनजागृती मेळावा संपन्न

 

क्रिडा संकूल येथे जेष्ठ नागरीक जनजागृती मेळावा संपन्न

 

           लातूर दि. 11 ( जिमाका ) जिल्‍हा ज्‍येष्‍ठ नागरिक संघ, क्रिडा संकुल लातूर येथे नुकताच ज्‍येष्‍ठ नागरिकांचे जनजागृती शिबीर व नागरिकांचा मेळावा संपन्न झाला असल्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                 या  जनजागृती मेळाव्‍यास  ज्‍येष्‍ठ नागरिक महासंघातील  डॉ. भास्‍कर रामराव पाटील राज्‍यस्‍तरीय ज्‍येष्‍ठ नागरिक समिती सदस्य , श्रीमती डॉ. माया कुलकर्णी जिल्‍हास्‍तरीय ज्‍येष्‍ठ नागरिक समिती सदस्य, अॅड आण्‍णाराव भुसणे,  प्रकाश घादगीने,  मनोहर कावळे व इतर  सर्व पदाधिकारी तसेच लातूर जिल्‍ह्यातील ज्‍येष्‍ठ नागरिक मेळाव्‍यास उपस्थित होते.  तसेच समाज कल्‍याण कार्यालयातील समाज कल्‍याण निरिक्षक  संदेश घुगे,  कमलाकर चव्‍हाण (व. लि.), शिवाजी पांढरे (क. लि.), तालुका समन्‍वयक व इतर कर्मचारी उपस्थित होते. 

                 या मेळाव्‍यात उपस्थित ज्‍येष्‍ठ नागरिकांना ज्‍येष्‍ठ नागरिक‍ कायद्याची माहिती देण्‍यात आली.  तसेच थोडेसे मायबापासाठी पण  या उपक्रमाअंतर्गत लातूर जिल्‍ह्यात portal.aadharwad.com हे संकेतस्‍थळ विकसीत करण्‍यात आलेले आहे. आजतागायात या संकेतस्‍थळावर  २०५९१६ (दोन लाख पाच हजार नऊशे सोळा) ज्‍येष्‍ठ नागरिकांची नोंदणी झालेली आहे. नोंदणी झालेल्‍या दिव्‍यांग ज्‍येष्‍ठ नागरिकांना कृत्रिम अंग व उपकरणे पुरवठा करणे साठी केंद्र शासनाकडे (ALIMCO) या कार्यालयाचा पाठपुरावा चालू आहे.   अशी माहिती देण्‍यात आली.

                    या कार्यालयातील श्री पांढरे यांनी ज्‍येष्‍ठ नागरिक संघातील सर्व पदाधिकारी व जिल्‍ह्यातील ज्‍येष्‍ठ नागरिक यांना portal.aadharwad.com या संकेतस्‍थळावर नोंदणी करणे बाबत आवाहन  केले.  तसेच ज्‍येष्‍ठ नागरिक कायद्याविषयी माहिती तालुका समन्‍वयक श्रीराम शिंदे यांनी दिली.  तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन संदेश घुगे यांनी केले. 

000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु