महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कारासाठी 20 एप्रिल पर्यंत अर्ज करावेत
महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा
पुरस्कारासाठी 20 एप्रिल पर्यंत अर्ज करावेत
*लातूर दि.6(जिमाका)* महात्मा बसवेश्वर
सामाजिक समता -शिवा पुरस्कार देण्याकरीता जिल्ह्यातील इच्छूक व्यक्ती व संस्था यांनी
संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे सिलबंद लिफाफ्यात दि. 20 एप्रिल
2022 पर्यंत रितसर अर्ज करावेत असे सहाय्यक लेखाधिकारी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,
लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
शासन निर्णयान्वये महात्मा बसवेश्वर
सामाजिक समता-शिवा पुरस्कार वीरशैव-लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, अध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक
क्षेत्रात काम करित असलेल्या व्यक्तीच्या व संस्थांच्या कामाची दाद/दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी या साठी समाज सेवक,
कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते,
अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावून पुढे यावेत याकरिता व्यक्तींसाठी
एक व सामाजिक संस्थेसाठी एक असे एकूण दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत.
सदरहू पुरस्कार सन 2018-19, 2019-20,
2020-21 व 2021-22 अशा
चार वर्षांसाठी चार वेगवेगळे रितसर अर्ज करण्यात यावेत. तसेच सदरहू अर्ज हे दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी
पुर्वी सादर करण्यात यावेत. या पुरस्कारासाठी
पात्रताबाबतची नियमावली शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेली असून महाराष्ट्र
शासनाच्या वेबसाईटवर संबंधित शासन निर्णय असून त्याचा सांकेतांक क्रमांक 201903082039003522
असा आहे.
सदर पुरस्कार देण्याकरीता जिल्ह्यातील इच्छुक व्यक्ती व संस्था यांनी संबंधीत
जिल्ह्याच्या सहायक आयुक्त कार्यालयाकडे शिलबंद लिफाफ्यात रितसर अर्ज करण्यात यावेत.
इच्छूक संस्था व व्यक्ती यांनी सदरहू पुरस्कार संदर्भात संबंधीत जिल्ह्याच्या सहायक
आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे दिनांक 20 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज करावा. विहीत नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त समाज कल्याण लातूर यांच्याकडे उपलब्ध आहेत.
000
Comments
Post a Comment