जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेशासाठी 9 एप्रिल रोजी परीक्षा

 

जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेशासाठी

             9  एप्रिल रोजी परीक्षा

 

        *लातूर दि.5(जिमाका)* जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथे इयत्ता नववीसाठी काही जागा रिक्त असल्याने त्या भरण्यासाठीची लेखी परीक्षा 9 एप्रिल 2022 रोजी होणार आहे . ही परीक्षा जवाहर नवोदय विद्यालय, लातूर  (परीक्षा क्र. 215239  ते 215502 ) व संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल लातूर (परीक्षा क्र. 215503  ते 215796 ) या परीक्षा केंद्रावर होणार असल्याचे प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

          जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीसाठीच्या 80 जागासाठीची प्रवेश परीक्षा होऊन विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालयात दिले जाते . परंतु , इयत्ता सहावी ते नववी पर्यंत जे विद्यार्थी विद्यालयातून आपले प्रवेश रद्द करतात त्यांच्या जागा पुन्हा इयत्ता नववीसाठी भरल्या जातात . या साठीची लेखी परीक्षा 9 एप्रिल 2022  रोजी होणार आहे .

          ही प्रवेश परीक्षा लेखी स्वरूपाची असून ज्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केलेले आहेत त्यांचे परीक्षा  प्रवेशपत्र www.navodaya.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध झाले असून परीक्षेवेळी या प्रवेश पत्राची  प्रिंट घेऊन येणे आवश्यक आहे . या बाबत अधिक माहितीसाठी प्रवेश परीक्षा प्रभारी बी. डी . शेख  (9817834930) किंवा व्ही . एच . खिल्लारे (9860568840) यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयचे प्राचार्य जी. रमेश राव यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा