शासकीय मुलांची निवासी शाळा एमआयडीसी येथे महात्मा फुले जयंती साजरी

 

शासकीय मुलांची निवासी शाळा

एमआयडीसी येथे महात्मा फुले जयंती साजरी

*लातूर दि. 12 ( जिमाका ):-*   अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा एम.आय.डी.सी. लातूर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापक किसन कुडके यांनी महात्मा फुले यांच सामाजिक कार्य या विषयावर मार्गदर्शन केले असल्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याणचे सहायक लेखाधिकारी डी.के. राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त दिनांक 11 एप्रिल, 2022 रोजी निवासी शाळेतील विद्यार्थी सकाळी 6-00 ते रात्री 12-00 असे एकूण 18 तास अभ्यास करण्यासाठी बसलेले होते. या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ए. एस. धिवार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती वाघ यांनी केले.

****  

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा