भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त आयोजित विविध कार्यक्रम

 

                       भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

131 व्या जयंती निमित्त आयोजित विविध कार्यक्रम

 

         

    लातूर,दि.14,(जिमाका):- अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच त्याचे उद्देश साध्य व्हावेत, या करीता राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम दि. 06 एप्रिल 2022 ते 16 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये साजरा करण्यात येत आहे.

          डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग अविनाश देवशेटवार,  तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे  डॉ. जयद्रथ जाधव, , यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन करुन सदर कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तद्नंतर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण एस. एन चिर्कुते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमा निमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम, व्दितीय व तृतिय आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.  तसेच तृतीयपंथी यांना ओळखपत्र, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.

तसेच उपस्थित मान्यवरांनी  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले डॉ. जयद्रथ जाधव यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठीचे कार्य विशद केले.  दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत लाभ दिलेल्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व  सदर योजनेबाबत श्री. चिकटे यांनी मनोगत व्यक्त केले.

          या कार्यक्रमास  श्री. डाके साहेब, सहाय्यक संचालक, पुराणिक साहेब, समाज कल्याण अधिकारी गट-ब,. सकट, लेखाधिकारी, साबणे, सहाय्यक लेखाधिकारी, प्रादेशिक उपायुक्त, कार्यालय, लातूर तसेच  महात्मा बसवेश्वर समाजकार्य महाविदयालयाचे विभाग प्रमुख, डॉ. दिनेश मौने, प्राध्यापक  काशिनाथ पवार, उपस्थित होते. तसेच प्रादेशिक उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, सर्व मागासवर्गीय विकास महामंडळ, लातूर येथील अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते. 

          कार्यक्रमाची सांगता कवी संमेलनाने संपन्न झाली. या कवी संमेलनास कवी योगिराज माने, विश्वंभर इंगोले व वंदना केंद्रे हे सहभागी झालेले होते.  या कवी संमेलनामध्ये आभाळावर लिहिलेलं एक नांव.. भिमराव !! काळजात जपलेलं एक गांव..भिमराव!!  ही कविता योगिराज माने यांनी सादर केलh. विश्वंभर  इंगेाले व वंदना केंद्रे यांनी समयोचित कविता सादर केल्या. सुत्रसंचालन योगिराज माने यांनी केले. व आभार प्रदर्शन नागेश जाधव यांनी केले.

 

                                   000

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा