लातूर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयात निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध

 

लातूर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयात निर्धन व दुर्बल घटकांतील

रुग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध

*गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा*

          * लातूर,दि.28(जिमाका):-*लातूर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयात निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध्‍ आहेत. याचा लाभ गरजू रुग्णांना मिळण्याकरीता सदरील धर्मादाय रुग्णालयांची यादी व इतर लागणारी अनुषंगिक माहिती याबाबतचे  टिपन पूढील प्रमाणे आहे.

         धर्मदाय रुग्णालयात / वैद्यकीय केंद्रात निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दरात उपचार. निर्धन रुग्ण ज्यांचे वार्षीक उत्पन्न रु. 85 हजार पेक्षा कमी आहे.दुर्बल घटकातील रुग्ण ज्यांचे  उत्पन्न रु. 1 लाख 60 हजारापेक्षा कमी आहे.

        उपचारासाठी लागणारे कागपत्रे- पिवळी शिधापत्रिका किंवा दारिद्रय रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र.

         रुग्णालयाचे नाव , निर्धन रुग्णांसाठी राखीव खाटांची संख्या व दुर्बल घटकांची, राखीव खाटांची संख्या पूढील प्रमाणे आहे. विवेकानंद रुग्णालय सिग्नल कँम्प लातूर निर्धन रुग्णांसाठी राखीव खाटांची संख्या-14 दुर्बल घटकांसाठी राखीव खाटांची संख्या-5  कै. बब्रुवानजी विठ्ठलरावजी काळे (मांजरा चॅरी) आयुर्वेदिक रुग्णालय गांधी मार्केट लातूर

निर्धन रुग्णांसाठी राखीव खाटांची संख्या-10 दुर्बल घटकांसाठी राखीव खाटांची संख्या – कै. हरीरामजी भट्ट रुग्णालय बस स्टँन्ड समोर लातूर, निर्धन रुग्णांसाठी राखीव खाटांची संख्या-5  दुर्बल घटकांसाठी राखीव खाटांची संख्या-1, यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, (एमआयटी) अंबाजोगाई रोड उडाण पूला जवळ लातूर, निर्धन रुग्णांसाठी राखीव खाटांची संख्या-70 दुर्बल घटकांसाठी राखीव खाटांची संख्या-13, उदयगिरी लायन्स आय हॉस्पीटल, उदगीर- निर्धन रुग्णांसाठी राखीव खाटांची संख्या-5 दुर्बल घटकांसाठी राखीव खाटांची संख्या-4, धन्वंतरी आयुर्वेदिक मेडीकल महाविद्यालय अँन्ड रुग्णालय, उदगीर- निर्धन रुग्णांसाठी राखीव खाटांची संख्या-6 दुर्बल घटकांसाठी राखीव खाटांची संख्या—व नेत्र प्रतिष्ठाण आय हॉस्पीटल एम आय डी सी लातूर येथे निर्धन रुग्णांसाठी राखीव खाटांची संख्या-1 दुर्बल घटकांसाठी राखीव खाटांची संख्या—

      वरील प्रमाणे धर्मादाय रुग्णालयाचा लाभ  गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

                                                   000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु