सन 2017-18 शेतीनिष्ठ चाकूर तालुक्यातील लातूर रोड पो. मोहनाळचे दिनकर पाटील यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार शास्त्रोक्त पध्दतीने शेतीतून शेतीचा विकास करणारा शेतकरी
सन 2017-18 शेतीनिष्ठ चाकूर तालुक्यातील
लातूर रोड पो. मोहनाळचे दिनकर पाटील यांना
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार
शास्त्रोक्त पध्दतीने
शेतीतून शेतीचा विकास करणारा शेतकरी
लातूर जिल्ह्यातील
चाकूर तालुक्यातील राहणार लातूर रोड पो. मोहनाळ येथील दिनकर विठ्ठलराव पाटील याचं शिक्षण
बी. कॉम झालेलं आहे. त्याना नुकताच वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार सन
2017-18 महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून
जाहीर झाला आहे.
शेतकरी
दिनकर पाटील यांनी स्वत:च्या शेतात राबविलेले उपक्रम
शेतकरी दिनकर विठ्ठलराव पाटील यांनी शेतक-यांसाठी मधुमक्षीकापालन प्रशिक्षण शिबीर आयोजित करुन मार्गदर्शन केलेले आहे, मधमाशीचे योग्य संगोपन करण्यासाठी कार्यक्रम करतात. म्हणजे ते ऐकूणच मधमाशाचे अभ्यासक आहेत. सध्या निर्सगातील मधमाशा खूप मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे परागीकरण होत नाही. पर्यायाने उत्पादकता कमी होते व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत, त्यावर उपाय म्हणून ज्या शेतकऱ्यांना पॉलिनेशनची गरज आहे. त्यांच्या शेतावर मधमाशांच्या पोळ्या ठेऊन त्यांच्या पिकांचे परागीकरण करण्याचे काम मागील 12 वर्षापासून अविरत चालू आहेत, त्यामुळे त्यांचे कित्येक लाख रुपयांचे उत्पन्न वाढत आहे.
किपरर्सच्या माध्यमातुन वेळोवेळी प्रशिक्षण शिबीरे घेऊन शेतकरी बांधवांना मधूमक्षीका पालन विषयी मार्गदर्शन तर ते करतातच त्याबरोबर फळबाग लागवड आंबा, सिताफळ, व इतर फळे लागवड स्वतः च्या शेतात करून इतरांनाही धडे देतात. विविध कृषी विज्ञान केंद्रात जाऊन शेतकऱ्यांना माहिती देतात. देशांतर्गत दौऱ्याबाबतची माहिती उदा - किसान कृषी ॲग्रो शासनाच्या कृषी प्रदर्शनास कृषी विज्ञान केंद्रे, ॲग्रोवन कृषी विदयापीठे यांना दरवर्षी नियमित भेट देऊन तंत्रज्ञानाची महिती घेतात.
उत्पादित मालाच्या मूल्यवृध्दी व विक्रीसाठी संपूर्ण भारतात ऑनलाईन व्दारे मधविक्री करतात. नामांकित संस्थेचे सदस्य आहेत. (एन.एच.बी- ब्रिडर म्हणून मान्यता, सदस्य, नॅशनल बी बोर्ड, दिल्ली, भारत सरकार, मास्टर ट्रेनर, केंद्रचालक खादी ग्रामउद्योगमंडळ महराष्ट्र राज्य ) प्रशिक्षण दरवर्षी दर वर्षी जुन ते सप्टेंबर चार महिन्याच्या कालावधीसाठी निवासी प्रशिक्षण आयोजित केले जाते. व मार्गदर्शन केले जाते.
कांदयाचे बिज उत्पादन घेण्यासाठी शेतक-यांना मधमाशीची आवश्यकता असते त्यांची ती गरज लक्षात घेऊन कांदा बिज उत्पादनासाठी शेतक-यांना अत्यअल्प दरात मधमाश्यांचे वसाहती उपलब्ध करुन देतात. सकाळ इंटरनॅशनल लर्निग स्कूल पुणे यांच्याकडून मधूकक्षिकापालन प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मागील सहा वर्षापासून विषयतज्ञ म्हणून वर्षातून चार वेळा ते तिथे जातात. खादी ग्रामउद्योग महाबळेश्वर यांचे 1 महिन्यांचे केद्रचालक हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करुन यांच्या विविध प्रशिक्षणवर्गात विषयतज्ञ म्हणूनही ते जातात. परदेशी दौरा आफ्रिकेतील इथीयेापिया या देशात 2017 साली तेथील अदिवासी लोकांकडून शास्त्रोक्त मधमाशी पालनाचे एक महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या त्यांनी पूर्ण केले आहे.
कृषि गट मधमाशी पालनाचा प्रसार व त्यांचे शेतातील महत्व शेतक-यांना पटवुन देण्यासाठी कृषिगटाची स्थापना त्यांनी केली आहे व त्यातून शेतकऱ्यांमध्ये मधमाशी पालनाच्या जागृकतेचे काम अविरतपणे सुरु आहे. त्यामुळे परिसरातील शेकडो शेतक-यांना त्याचा लाभ होतो व त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढते. दरवर्षी जवळपास दिड ते दोन हजार विद्यार्थी त्यांच्या मधमाशी पालनाच्या उदयोगाला भेट देतात व एक दिवसाचे मार्गदर्शन घेऊन जातात.
---
युवराज पाटील,
जिल्हा
माहिती अधिकारी,
लातूर
Comments
Post a Comment