प्रलंबित प्रकरणातील कमी पडलेल्या मुद्रांक शुल्कावर आकारण्यात येणाऱ्या शास्ती दंडामध्ये शासनाने अभय योजना- 2022 अंतर्गत सवलत जाहीर
प्रलंबित प्रकरणातील कमी पडलेल्या मुद्रांक
शुल्कावर आकारण्यात येणाऱ्या शास्ती दंडामध्ये शासनाने अभय योजना- 2022 अंतर्गत सवलत
जाहीर
लातूर,दि.26(जिमाका):- महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम 31, 32(अ),
33, 33(अ), 46, 53(1अ) 53(अ) अंतर्गत मुद्रांक जिल्हाधिकारी लातूर व अधिनस्त सह दुय्यम
निबंधक वर्ग-2 लातूर क्र.1, लातूर क्र.2 व उदगीर तसेच दुय्यम निबंधक श्रेणी-1 औैसा,
अहमदपूर, चाकूर, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ, रेणापूर, मुरूड व जळकोट यांच्या कार्यालयातील प्रलंबित प्रकरणातील कमी पडलेला मुद्रांक
शुल्कावर आकारण्यात येणाऱ्या शास्ती / दंडामध्ये
शासनाने अभय योजना 2022 अंतर्गत सवलत जाहीर केलेली आहे. सक्षम अधिकारी यांनी दि.31 मार्च 2022 पुर्वी ज्या प्रकरणात दंड वसूलीबाबत पक्षकारास किमान एक
नोटीस बजावलेली आहे अशा सर्व प्रकरणांना सदरची सवलत लागू राहील.
सदर योजनेअंतर्गत अर्ज दाखल करण्याची
मुदत दिनांक 01 एप्रिल 2022 ते दिनांक 30 सप्टेंबर 2022 इतकी असून दि.01 एप्रिल 2022
ते 03 जून 2022 कालावधीत दाखल होणा-या प्रकरणांसाठी दंड रक्कमेच्या 90 टक्के सवलत आणि दि.01 जूलै 2022 ते 30 सप्टेंबर 2022 कालावधीत
दाखल होणा-या प्रकरणांसाठी दंड रक्कमेच्या 50 टक्के देण्यात येईल. मुळ मुद्रांक शुल्क
शासन जमा केल्यानंतर आकारल्या जाणा-या दंडामध्ये सवलत मिळेल परंतू मुळ मुद्रांक शुल्कामध्ये
कोणतीही सुट अथवा सवलत मिळणार नाही. तसेच अर्जदांराना अभय योजना 2022 आदेशातील अटी
व शर्तींचे पालन करणे बंधनकारक राहील.
सदर योजनेअंतर्गत अर्जदारांनी
करावयाचा अर्जाचा नमूना मुद्रांक जिल्हाधिकारी व सह दुय्यम वर्ग-2 / दुय्यम निबंधक
कार्यालय येथे तसेच विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in
या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. अर्जासोबत दि.31 मार्च 2022 पुर्वी बजावण्यात आलेल्या
नोटीसची प्रत सादर करणे आवश्यक आहे. सर्व नागरिकांनी या सवलतीचा जास्तीत जास्त लाभ
घ्यावा असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी ध.ज.माईनकर, लातूर यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment