जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन शैक्षणिक अर्ज स्विकारण्यासाठी 12 एप्रिल रोजी विशेष मोहिमेचे आयोजन

 

जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन शैक्षणिक अर्ज

स्विकारण्यासाठी  12 एप्रिल रोजी विशेष मोहिमेचे आयोजन

 

लातूर दि.11(जिमाका) सामाजिक समता सप्ताह विशेष मोहिमे अंतर्गत जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन भरलेले शैक्षणिक अर्ज स्विकारण्यासाठी जिल्हयात 12 एप्रील 2022 रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या विशेष मोहिमीचे ठिकाणी सकाळी 10.00 ते सांयकाळी 5.00 या वेळेत अर्ज सादर करण्यात येणार आहेत शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापणाने आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या व घेऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्याच्या निदर्शनास आणून दयावे असे अवाहन लातूर जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने केले आहे.

          समाज कल्याण आयुक्त व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) चे महासंचालक यांचे सुचनेनुसार सामाजिक समता सप्ताह निमीत्ताने लातूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेच्या  अनुषंगाने व्यावसाईक अभ्यासक्रमासाठी व राखीव प्रवर्गात लाभ घेण्यासाठी संबधीत अर्जदारास अर्ज करतांना जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश प्रक्रिया  नोंदणी अर्जासोबत अपलेाड करणे आवश्यक आहे. इयत्ता 12 वी विज्ञान शाखेमध्ये व पदविका (डिप्लोमा) तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारशी सह सामाजिक समता सप्ताह निमीत्ताने विशेष मोहिमेत 12 एप्रील 2022 रोजी पुढील ठीकाणी तालूका स्तरावर ऑनलाईन भरलेले परिपूर्ण अर्ज स्विकारले जाणार आहेत.

          या विशेष मोहिम कार्यक्रमाचे वेळा पत्रक मंगळवार दि. 12 एप्रील 2022 रोजी वेळ सकाळी 10.00 ते सांयकाळी 5.00 वाजे पर्यत राहील. या विशेष मोहिमेचे स्थळ  व संबंधीत तालुक्याचे नांव पुढील प्रमाणे आहे. लातूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सभागृह येथे लातूर, औसा, रेणापूर,चाकूर, शिरुर    निलंगा या तालुक्यातील सर्व संबंधीत महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्याचे ऑनलाईन भरलेले अर्ज स्विकारणे तसेच महाराष्ट्र उदयगीरी महाविद्यालय उदगीर ता.उदगीर जि. लातूर येथे अहमदपूर, जळकोट, उदगीर , देवणी या तालूक्यातील सर्व संबंधीत महाविलयातील मागावर्गीय विद्यार्थ्याचे ऑनलाईन भरलेले अर्ज  स्विकारणे.

          अर्जदारांनी मुदतीत जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर न केल्यामुळे समितीला अर्जावर मुदतीत प्रक्रिया पुर्ण करुन वैद्यता प्रमाणपत्र/समिती निर्णय देणे अशक्य झाल्यास तसेच त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाल्यास अथवा त्रुटी असलेली प्रकरणे विहित मुदतीत निकाली न निघाल्यास त्यामुळे अर्जदार प्रवेशापासुन वंचित राहील्यास समिती जबाबदार राहणार नाही असेही लातूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट केले आहे.

0000

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा