महाराष्ट्र दिनी जिल्हाभरात सामाजिक न्यायाचा जागर

 

महाराष्ट्र दिनी जिल्हाभरात

सामाजिक न्यायाचा जागर

         

*लातूर,दि.28,(जिमाका):-* जिल्हयामध्ये दि. 01 मे, महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील गावागावात झेंडावंदनाच्या  ठिकाणी योजनांची माहितीपत्रिका / माहितीपुस्तीका पोहचणार तसेच सामाजिक लोकप्रतिनिधी / प्रशासकिय अधिकारी - कर्मचारी जनतेला विविध योजनांची माहिती देणार आहेत.

दिनांक 1 मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सामाजिक न्यायाचा जागर करण्याची अभिनव संकल्पना अंमलात आणली असून यासंदर्भात दि.21 एप्रिल 2022 रोजीचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे.

या शासन निर्णयानुसार दि.01 मे, महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून संबंध जिल्ह्यात झेंडा वंदनाच्या वेळी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणारी माहितीपुस्तीका किंवा माहितीपत्रीका वाटप करण्यात येणार आहे.

 जिल्हयांच्या ठिकाणी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, यांचे प्रमुख उपस्थितीत योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिका, नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत व ग्रामिण भागात लोकप्रतिनिधी  / प्रशासकिय अधिकारी - कर्मचारी यांच्यामार्फत योजनांचे संक्षिप्त स्वरुपात वाचनही करण्यात येणार आहे.

यावर्षी देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  साजरा करण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागाने राज्य कोवीड निर्बंध मुक्त होताच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची  जयंती दि.06 एप्रिल 2022 ते दि.16 एप्रिल 2022 या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करुन साजरी करण्यात आली आहे.

अनुसूचित जाती नवबौध्द घटक यासह समाजातील आर्थिक दुर्बल व मागास घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वैयक्तीक व सामुहिक लाभाच्या योजना कार्यान्वीत आहेत, या योजनांच्या बाबतीत जनजागृती करुन तळागाळातील गरजूंना लाभ मिळवून देणे हा यामागचा उदेश असल्याचे म्हटले आहे.

 दिनांक-01 मे, महाराष्ट्राच्या दिनाच्या दिवशी ध्वजारोहण होणाऱ्या सर्व शासकिय आस्थापनांच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स, बॅनर्स लावणे तसेच माहितीपत्रिका / माहितीपुस्तीका वाटप करणे यासाठी विभागाने नियोजन केले असल्याचे सहायक आयुक्त समाज कल्याण लातूर यांच्यामार्फत या उपक्रमाची येत्या महाराष्ट्र दिनी अमलबजावणी करण्यात येणार आहे.

                                                        0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु