नाशिक येथे लातूर जिल्ह्यातील चार विविध शेतकऱ्यांचा गौरव लिंबाळवाडी - नागनाथ पाटील, मोहनाळ - दिनकर पाटील, महादेववाडी - ओमकार मसकल्ले, मुरुड बु. येथील मुरलीधर नागटिळक यांना गौरविण्यात येणार

 

नाशिक येथे लातूर जिल्ह्यातील चार विविध शेतकऱ्यांचा गौरव

लिंबाळवाडी - नागनाथ पाटील, मोहनाळ - दिनकर पाटील,

महादेववाडी - ओमकार मसकल्ले, मुरुड बु. येथील मुरलीधर नागटिळक यांना गौरविण्यात येणार 

लातूर,दि.29 (जिमाका):-  राज्यातील कृषि, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन- उत्पन्नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने विविध कृषि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. दि. २ मे रोजी नाशिक येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात सन २०१७, २०१८ आणि २०१९ या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

कृषि, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन- उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणा-या व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी- कर्मचाऱ्यांना कृषि विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात २ मे रोजी सकाळी ११ वाजता तीन वर्षातील १९८ पुरस्कारार्थ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, फलोत्पादन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कृषि पुरस्कारासाठी लातूर जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. यात श्री. नागनाथ भगवंत पाटील रा. लिंबाळवाडी पो. नळेगा

















व ता. चाकुर जि. लातुर यांना सन 2018 -19 या वर्षांचा वसंतराव नाईक शेतीनिष्‍ठ पुरस्काराने, तर रा. लातूर रोड पो. मोहनाळ ता. चाकुर जि. लातुर येथील दिनकर विठठलराव पाटील यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्‍कार तर देवणी तालुक्यातील महादेववाडी येथील ओमकार माणिकराव मसकल्ले,सर्व साधारण गटातून सन 2017 चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार लातूर तालुक्यातील मुरुड बु. येथील मुरलीधर गोविंद नागटिळक  यांना देऊन गौरविण्यात येणार आहे.


****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु