माताजी नगर येथे पथनाट्य व लघुनाटीका कार्यक्रम संपन्न

 

माताजी नगर येथे

पथनाट्य व लघुनाटीका कार्यक्रम संपन्न  

लातूर दि. 12 ( जिमाका ):-  समतादुतामार्फत पथनाट्य व लघुनाटीका कार्यक्रम माहामाया बुध्द विहार, माताजी नगर, लातूर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबतची माहिती देवून पथनाट्य व लघुनाटीकाद्वारे प्रबोधन करण्यात आले , असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याणचे सहायक लेखाधिकारी डी.के. राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहे. या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच त्याचे उद्देश साध्य व्हावेत, याकरिता राज्यात सामाजिक न्याय व विशेष विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम दिनांक 6 एप्रिल, 2022 ते दिनांक 16 एप्रिल, 2022 या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन गोविंद मरे यांनी केले.

****   

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा